संस्थेच्या संचालक मंडळाने 2030 पर्यंत पुढील प्रमाणे व्हिजन तयार केलेले आहे.
असे म्हणतात की "No Vision, No Orgation" व्हिजन हा एक ब्रिज आहे पण तो दिसत नाही व्हिजन म्हणजे पुढच्या दहा वर्षात तुमचा व्यवसाय काय असेल ? कसा असेल ? कोठे असेल ?
व्हिजनमुळे सर्व टीमला Clarity मिळते सर्वांना कामाची दिशा मिळते व सर्वजण एकजुटीने कामाला लागतात. आपणास रोज उठून काय करायचे ते कळते. व्हिजन हे एखाद्या नदीसारखे असते. नदीमध्ये अनेक अडथळे असतात.
जसे दगड वाळू झाडे कचरा तरीसुद्धा ती मार्ग काढत असते. ती थांबत नाही. त्याप्रमाणेच व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येत असतात मग त्या अडचणीवर व्हिजन असलेल्या संस्थाच मात करतात कारण त्यांनी पुढच्या 10 वर्षाचा विचार केलेला असतो.
उदा. नोट बंदीचे संकट, कोविड-19, कर्मचारी सोडून जाणे, इत्यादी.
ज्या संस्थांना व्हिजन नसते त्यांना माहित नसते की आपणाला कोठे आणि कधी जायचे ते म्हणून ते कधीही काहीही करत असतात आणि म्हणतात हम होंगे कामयाब एक दिन !
अच्छे दिन येत नसतात ते आणावे लागतात म्हणून आधारने पुढील प्रमाणे व्हिजन तयार केले आहे.