आधार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांव ने आपल्यासाठी सुलभ व आकर्षक अशा कर्ज योजना आणलेल्या आहेत.
 
✽ सोनेतारण कर्ज (Gold Loan):
सोनेतारण कर्ज
ही योजना सभासदांचे तातडीचे कामकाज त्वरित व्हावे म्हणून आपल्या स्वतःच्या मालकीचे सोन्याचांदीचे दागिने तारण ठेवून त्यावर त्वरित कर्ज उपलब्ध करून मिळते. यासाठी कालावधी ६ महिने ते १२ महिन्यांचा असतो व १,००,००० रु. पर्यंत च्या कर्जाला कोणत्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी लागत नाही. १,००,००० रु. पुढील रकमे १०० रु. स्टॅम्प घेतला जातो. भरणा दरमहा किंवा ६ महिन्याला एक रकमी करता येतो.
✽ पगार तारण कर्ज (Salary Loan):
पगार तारण कर्ज
हे कर्ज घेण्यासाठी सभासद शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असावा लागतो. त्याचे पगारपत्रक तारण ठेवून व त्याच्या मुख्य अधिकाऱ्याचे हमीपत्र घेऊन कलम ४९ अंतर्गत दरमहा पगार कपातीच्या कमीवर दिले जाते.
कर्ज कर्जाची मर्यादा रु. ३,००,०००/-
कालावधी २ ते ५ वर्षे
व्याजदर १६% ते १८%
✽ वाहनतारण कर्ज (Vehical Loan):
वाहनतारण कर्ज
सदर कर्ज हे सभासदांना त्यांच्या कुटुंबासाठी कार / मोटारसायकल घेणे किंवा व्यवसायासाठी ऑटो, टेम्पो, ट्रॅक्टर किंवा ट्रक घेण्यासाठी संबंधित वाहनाच्या कोटेशनच्या २५% रक्कम सभासदाने भरल्यास उर्वरित ७५% रक्कम कर्जाऊ दिली जाते.
मर्यादा : रु. १५,००,०००/-
कर्ज मुदत : २४ ते ७२ महिने
व्याजदर १५% ते १८%
टीप :- सदर व्यक्तीचे तारण आणि उत्पन्न याचा अभ्यास करून व्याजदर ठरवला जातो.
✽ घर बांधणी/दुरुस्ती कर्ज (Home Loan):
घर बांधणी / दुरुस्ती कर्ज
ही योजना सभासदांना त्यांचे घर गहाणखत करून दिल्यानंतर त्यांच्या बांधकामासाठी किंवा बांधलेले घर खरेदी करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्ज दिले जाते.
पात्रता : मर्यादा : रु. १५,००,०००/-
कर्ज मुदत : ३ ते १५ वर्षे
व्याजदर : १८%
✽ व्यवसायिक / नजरगहाण कर्ज :
व्यवसायिक / नजरगहाण कर्ज
सभासदांना नवीन व्यवसाय सुरु करणे किंवा चालू असलेल्या व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
कर्ज मर्यादा : रु. १५,००,०००/-
कर्ज मुदत : ३ ते १० वर्षे
व्याजदर : १८%
✽ वैयक्तिक कर्ज (Personal Loan):
वैयक्तिक कर्ज
हे कर्ज सभासदांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेले आहे. यामध्ये दोन जमीनदारांची हमी घेऊन कोणतेही कारणाशिवाय पात्र व्यक्तीला त्याचे उत्पन्नाचे साधन पाहून दिले जाते.
कर्ज मर्यादा : रु. ५०,०००/-
कर्ज मुदत : १ ते ३ वर्षे
व्याजदर : १८%
✽ कॅश क्रेडीट कर्ज (C.C.):
कॅश क्रेडीट कर्ज
ही योजना व्यापारी बांधवांसाठी निर्माण केलेली आहे यामध्ये संबंधिताच्या व्यवसायाचा टर्न ओव्हर व बाजारातील पत पाहून त्याला हे कर्ज दिले जाते.
कर्ज मर्यादा : रु. १५,००,०००/-
कर्ज मुदत : १ वर्षे
व्याजदर : १८%
✽ कर्मचारी कॅश क्रेडिट योजना :
कर्मचारी कॅश क्रेडिट योजना
ही योजना केवळमात्र अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य व इतर अधिकारी लोकांना महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैशाची अडचण निर्माण होते व मग त्यांना कोणाकडे तरी हातउसने किंवा सावकाराकडून व्याजाने घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून आधारने ही योजना खास अधिकारी वर्गासाठी सुरू केलेली आहे.
कर्ज मर्यादा : १ लाख ते ५ लाख
कर्ज मुदत : १ ते ३ वर्षे
व्याजदर : १८%
✽ वेअर हाउस कर्ज :
वेअर हाउस कर्ज
सदर कर्ज व्यापारी व शेतकरी यांच्या वेअर हाऊस मध्ये ठेवलेल्या मालाची पावती तारणावर दिले जाते.
कर्ज मर्यादा : २५ लाख
कर्ज मुदत : ६ महिने ते १२ वर्षे
व्याजदर : १५%
✽ मुदत ठेव तारण कर्ज(E.D. Loan)
मुदत ठेव तारण कर्ज
हे कर्ज सभासदांनी आपल्या नावाने संस्थेत ठेवलेल्या मुदतठेव रकमेच्या पावतीच्या तारणावर दिले जाते. यासाठी केवळ पंधरा मिनिटात हे कर्ज दिले जाते.
कर्ज मर्यादा : जमा रकमेच्या ८०%
कर्ज मुदत : ६ महिने ते १ वर्ष
व्याजदर : १२%
✽ आर्वत ठेव कर्ज :
आर्वत ठेव कर्ज
हे कर्ज सभासदांनी आपल्या स्वतःच्या किंवा मुला मुलींच्या नावाने शुभमंगल ठेव / लक्षाधीश ठेवीचे खाते उघडलेले असते. अशा खातेदारांना त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रकमेच्या ८०% कर्ज ताबडतोब दिले जाते.
✽ एल.आय.सी. पावती तारण कर्ज :
एल.आय.सी. पावती तारण कर्ज
ही योजना ज्यांनी आपल्या स्वतःचा विमा काढलेला आहे. अशा लोकांना विमाचा बोंड तारण ठेवून कर्ज दिले जाते.
कर्ज मर्यादा : सरेंडर व्हॅल्यू पाहून ठरवले जाते.
कर्ज मुदत : १ वर्ष
व्याजदर : १२%
✽ पिग्मी कर्ज Pigmi Loan:
पिग्मी कर्ज
ही योजना पिग्मी भरणाऱ्या सभासदांसाठी आहे. जे लोक आपल्या दैनंदिन उत्पन्नातून रोज भरणा करतात. अशा सभासदांच्या पासबुकात जमा असलेल्या रकमेच्या ८०% कर्ज ताबडतोब दिले जाते.