ही योजना खास व्यापारी, डॉक्टर, पेट्रोल पंप, किराणा दुकानदार, इ. साठी सुरू केलेली आहे. व्यापारी आपला दिवसभराचा व्यवसाय झाल्यानंतर त्यांच्याकडे जमा झालेली कॅश त्यांना गल्यात किंवा घरी घेऊन जावे लागत असे म्हणून त्यांना दिवसभराची कॅश रात्री आपल्या खात्यात जमा करण्याची सोय यामुळे निर्माण झालेली आहे.
तसेच यामध्ये बँकेचा कर्मचारी दुकानावर येऊन कॅश घेऊन जातो व परत लागल्यास दुकानात नेऊन दिली जाते तसेच या खात्यात जमा होणाऱ्या खात्यातील रकमेला द.सा.द.शे. ८% प्रमाणे व्याजही मिळते.