आधार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगांव ने आपल्यासाठी आकर्षक अशा इतर सेवा आणलेल्या आहेत.
 
✽ मोबाईल बँकिंग (Mobile Banking):
मोबाईल बँकिंग
येणाऱ्या मोबाईल व इंटरनेटच्या जमान्यात बँक नाही तर बँकिंग असणार आहे म्हणून काळाचे पावले ओळखून सभासदांसाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध केलेली आहे.
या माध्यमातून करू
R.T.G.S. / N.E.F.T. शकता.
मनी ट्रान्सफर करू शकता.
I.M.P.S. करू शकता.
खाते उतारा आणि शिल्लक ठेवू शकता.
✽ लाईट बिल भरणा सुविधा :
लाईट बिल भरणा सुविधा
सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन संस्थेने लाईट बिल, फोन बिल, मोबाईल व टीव्ही रिचार्ज या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत
✽ एस. एम. एस. बँकिंग :
एस. एम. एस. बँकिंग
संस्थेच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी व ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून बँकेच्या सभासदांच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती एस.एम.एस. (SMS) द्वारे मिळावी म्हणून ही सुविधा सुरू केलेली आहे
✽ मिसकॉल अलर्ट सुविधा :
मिसकॉल अलर्ट सुविधा
सभासदांना त्यांच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम मोबाईल वर एस.एम.एस. (SMS) द्वारे समजावी या हेतूने संस्थेने मिसकॉल अलर्ट सुविधा तयार केलेली आहे. म्हणून सभासदांनी आपल्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवरून ०८०४५९३६०२२ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास आपल्या खात्यातील शिल्लक त्वरित मोबाईलवर एस.एम.एस. द्वारे समजते.
✽ ए.टी.एम. सुविधा (A.T.M.):
ए.टी.एम. सुविधा
आधारने मायक्रो ए.टी.एम. सुविधा सुरू केलेली आहे. यामध्ये ग्राहकाला कोणत्याही बँकेचे ए.टी.एम. वापरून ४०,०००/- रु. पर्यंत कॅश काढता येते. त्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाहीत. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा.
✽ एल. आय. सी. हप्ता भरणा सुविधा :
एल. आय. सी. हप्ता भरणा सुविधा
आधारच्या कोणत्याही शाखेतून एल. आय. सी. (LIC) चा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.